राज्य सरकारने घेतले 9
धडाकेबाज निर्णय
गणेशोत्सव-दिवाळीसाठी 100
रुपयांत मिळणार आनंदाचा
शिधा...
नुकतेच पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.सर्वात महत्वाचा म्हणजे कॅसिनो कायदा रद्द करण्याचा निर्णय हा राज्य सरकारने घेतला आहे.त्याचबरोबर जनतेला गणेशोत्सव आणि दिवाळीकरिता 100 रुपयांमध्ये आनंदाचा शिधा देण्याची घोषणा देखील बैठकीमध्ये करण्यात आलेली आहे.या निर्णयामुळे सर्वसामान्यांच्या आनंदामध्ये भर पडली आहे. याचबरोबर राज्य सरकारने अजून बरेच निर्णय घेतले आहेत ते आपण पाहूयात..
मंत्रीमंडळ बैठकीतील काही निर्णय:
1) गौरी गणपती, दिवाळीसाठी 100 रुपयात आनंदाचा शिधा. प्रत्येकी एक किलो रवा, साखर, खाद्यतेल आणि चणाडाळ.
2) आयटीआयमधील शिल्प कारागिर प्रशिक्षणार्थींना विद्यावेतनामध्ये भरीव वाढ आता दरमहा 500 रुपये मिळणार.
3) राज्यातील १७ जिल्ह्यांतील सर्व आदिवासी वाडे, पाडे आता मुख्य रस्त्याने जोडली जाणार असा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर भगवान बिरसा मुंडा जोड रस्ते योजना राबविणार असल्याची घोषणा देखील करण्यात आलेली आहे. या योजनेसाठी ५ हजार कोटीचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे.
हे पण वाचा: माझी कन्या भाग्यश्री योजना
4) मुंबई प्रेस क्लबला फोर्ट येथे पुनर्विकासासाठी परवानगी दिली गेली आहे.
5) महाराष्ट्र कॅसिनो कायदा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.
6) केंद्राच्या सूचनांप्रमाणे राज्यात पोषण अभियान कार्यक्रम.राज्याचा हिस्सा वाढला.
7) सहकारी संस्था आणि सभासदांबाबतचा २०२३ चा अध्यादेश मागे घेण्यात आला आहे.
8) दुय्यम न्यायालयातील निवृत्त न्यायिक अधिकाऱ्यांना सुधारित निवृत्तीवेतन देण्याची घोषणा करण्यात आली आहे.
9) मंडणगड येथे दिवाणी न्यायालय स्थापन करण्याची घोषणा देखील करण्यात आलेली आहे.
कॅसिनो कायदा रद्द
पावसाळी अधिवेशनात कॅसिनो कायदा रद्द करण्याच्या मागणीने जोर धरला होता. हा कायदा 1976 पासून अस्तित्वात आहे. मात्र याची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही.
यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ते मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये हा कायदा सुरू करण्यात येऊ नये अशी भूमिका मांडली त्यानंतर आज राज्य सरकाराने हा कायदा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
हे पण वाचा: लेक लाडकी योजना
हि कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही तसेच कोणत्याही शासनाशी निगडित वेबसाईट नाही. तरीही कोणी या वेबसाईटला official वेबसाईट समजू नका. कोणीही कमेंट मध्ये आपला आधार कार्ड नंबर तसेच मोबाईल नंबर टाकू नका किंवा वैयक्तिक माहिती सांगू नका. आम्ही कोणत्याही सरकारी योजनेतील तक्रारींवर लक्ष देऊ शकत नाही. तसेच या संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीबद्दल अधिकृत माहिती आपल्याला हवी असल्यास official वेबसाईटला संपर्क करा अशी मी विनंती करतो. धन्यवाद!