Aloe Vera Information and Benefits - कोरफडीचे संपूर्ण फायदे आणि माहिती मराठीमध्ये

 

Aloe Vera Information and Benefits - कोरफडीचे महत्वाचे फायदे आणि माहिती 


आयुर्वेदामध्ये बऱ्याच औषधी वनस्पती आहेत ज्यांचा वापर करून आपण निरोगी राहू शकतो.आपल्याला फक्त या औषधी वनस्पतींच्या सेवनाची योग्य पद्धत डॉक्टरांच्याकडून समजून घेणे गरजेचे असते.आपण पाहत असलेल्या लेखामध्ये कोरफड म्हणजेच एलो वेरा देखील याच औषधी वनस्पती पैकी एक आहे.त्याबद्दल Aloe Vera Information and Benefits आपण पाहणार आहोत.कोरफडीचा ताजा गर  हा सौंदर्यासाठी  जितका लाभदायक मानला जातो तितकाच तो आरोग्यासाठी देखील फायदेशीर ठरतो.कोरफडीमध्ये antibacterial, antifungal,anti-inflammatory सारखे पोषक घटक असतात.जे आपल्या आरोग्यासाठी लाभदायक ठरतात.


Aloe Vera Information and Benefits
Aloe Vera Information and Benefits


आजकाल कोरफड विषयी माहिती म्हणजेच एलो वेराचा Aloe Vera वापर वेगवेगळ्या समस्या मध्ये केला जात आहे.कोरफडीमध्ये व्हिटॅमिन ए, सी आणि इ यांप्रमाणेच कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम सारखे आवश्यक पोषक घटक असतात. कोरफडीमुळे पचनशक्ती सुधारण्यास मदत होते व प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.कोरफड हे सहजरित्या उपलब्ध होते. त्वचाविकारांवर कोरफड खूप फायदेशीर ठरते.'Aloe Vera Information and Benefits'

टीप:- ज्यांना त्वचेचा गंभीर आजार असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेऊन कोरफड म्हणजेच एलो वेराचा वापर करावा.


त्वचेला आग होणे आणि पित्त होणे यांवर  कोरफड उपयुक्त ठरते. झोपण्यापूर्वी कोरफडीच्या गरामध्ये ऑलिव्ह ऑइल टाकून ते उन्हामुळे काळवंडलेल्या त्वचेवर लावल्यास Aloe Vera Benefits फायदा होतो तसेच सुरकुत्या व पिंपल्स देखील कमी होण्यास मदत होते.


कोरफड वापरायच्या काही पद्धती व उपयोग आहेत ते आपण पाहूयात:


कोरफडीच्या रसाचा उपयोग व त्यामध्ये असणाऱ्या आतील गराचा उपयोग:

1) लठ्ठपणा कमी करण्यास मदत

रोज थोडे दिवस म्हणजेच तेही (डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार) आपण साधारण 20 ते 30 मिली कोरफडीचा रस पिल्यास (आयुर्वेदानुसार)बरेच असे फायदे मिळतात. कोरफडीमध्ये Anti-inflammatory गुण असतात. त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

कोरफडीमुळे शरीरातील मेद जळण्यास मदत होते. कोरफडीचा रस पित असल्यामुळे शरीरामध्ये मेद कमी होण्यास मदत होते. त्यामुळे जास्त वजन असणाऱ्या लोकांसाठी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार कोरफडीचा रस पिणे फायदेशीर ठरते.

हे पण वाचा: तुळशीचे फायदे आणि माहिती - Tulsi Benefits and Information in Marathi

2)पचनक्रियेसाठी कोरफड फायदेशीर

जास्त तिखट,मसालेदार पदार्थ खाल्ल्यांमुळे पोट बिघडते, तर या त्रासापासून आराम मिळवायचा असल्यास कोरफडीच्या रसाचे सेवन केल्यास फायदा होतो व तक्रार कमी होते किंवा कोरफडीची साल काढुन त्या गरामध्ये थोडी साखर टाकून पिल्यास पोट दुखीवर आराम मिळू शकतो.Laxetive लॅकजेटीव्ह नावाचा प्रकार हा कोरफडीमध्ये आढळतो त्यामुळे पचन शक्ती सुधारण्यास मदत होते.कोरफडीच्या रसामुळे शरीरातील आतड्यांची शुद्धी होण्यास मदत होते, Detoxification होते. तसेच पोटाचा अल्सर,पित्त अशा आजारांवर कोरफड उपयुक्त ठरते.ज्यांना Ulcerative Colitis अल्सरेटिव्ह कोलायटीस असेल अशा लोकांनी कोरफडीचे सेवन टाळावे.


3) हाडांसाठी कोरफड फायदेशीर

जस जसे वय वाढते तस तसे हाडांची झीज म्हणजेच हाडे ठिसूळ होत जातात.हाडे ठिसूळ झाल्यामुळे जॉईंट पेन म्हणजेच सांध्यांमध्ये वेदना होऊ लागतात.एका अभ्यासानुसार कोरफड हि (Osteoarthritis) ऑस्टिओआर्थराइटिस साठी कोरफड हि फार उपयुक्त औषध ठरते.
डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार कोरफडीच्या सेवनाचे प्रमाण ठरवून त्या आजारापासून सुटका होण्यास मदत होऊ शकते.


4)कोलेस्ट्रॉलसाठी फायदेशीर


शरीरामध्ये कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढल्यामुळे लठ्ठपणा
जाणवू लागतो.जर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार योग्य प्रमाणात एलो वेरा चे सेवन केल्यास कोलेस्टेरॉल चे प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत होते.


5)सर्दी व खोकला यांवर कोरफडीचा रस उपयुक्त


वारंवार सर्दी व त्यासोबतच खोकला येत असेल तर कोरफडीचा रस घ्यावा याचा फायदा होतो.
सध्याच्या वातावरणात सारखे बदल होत असतात त्यामुळे कोरडा खोकला येतो त्यासाठी तो खोकला नैसर्गिकपद्धतीने जावा यासाठी 30 मिली कोरफडीच्या रसामध्ये 2 ते 3 चमचे मध टाकून पिल्यास खोकला कमी होण्यास मदत होते. असे किमान 2 वेळा दिवसातून केल्यास खोकला कमी होऊ शकतो.
यामध्ये आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्लाही घेणे गरजेचे आहे.


6) त्वचेसाठी फायदेशीर 


त्वचा चमकदार आणि तेज बनवायची असल्यास रोज रात्री झोपताना कोरफडीचा ताजा जेल लावल्यास किंवा त्यामध्ये ऑलिव्ह ऑइल टाकून चेहऱ्याला लावल्यास त्याचा नक्की फायदा होऊ शकतो. कारण कोरफडीमध्ये 90 टक्क्यापेक्षा जास्त प्रमाणात पाणी असते.तसेच कोरफडीमध्ये अँटिऑक्सिडेंट असतात जे त्वचेच्या सातव्या लेयर पर्यंत जाऊन ऍक्शन करतात,त्यामुळे त्वचेवरील हरवलेली आद्रता किंवा स्निग्धता भरून येण्यास मदत होते ते चेहऱ्यासाठी फायदेशीर आहे. कोरफडीच्या जेलमध्ये विविध पोषक घटक असतात त्यामुळे त्वचा चमकदार किंवा त्वचेवर तेज येण्यास मदत होते व त्वचेवरील सुरकुत्या देखील कमी होण्यास मदत होते.त्वचा हि धुळी मुळे खराब होतो अशावेळी कोरफडीचा गर घेऊन तो चेहऱ्याला लावावा व हळुवार मसाज करावा व पाच मिनिटे ठेवून पाण्याने चेहरा धुवून टाकावा असे केल्याने कोरफडमधील असणाऱ्या अँटिऑक्सिडंट मुळे स्किन तजेलदार बनते.



7)केसांतील कोंड्यासाठी कोरफडीचा जेल किंवा ताजा रस उपयुक्त


केसांमध्ये जास्त कोंडा किंवा आग किंवा खाज होत असेल तर कोरफडीचा जेल किंवा ताजा रस हे खोबरेल तेलामध्ये मिसळून लावावे व थोड्या वेळाने म्हणजेच अर्ध्या ते पाऊण तासाने डोके धुवावे,यामुळे केसांना moisture पणा मिळेल,थंडावा मिळेल जेणेकरून कोंडा कमी होण्यास मदत होईल.यामुळे केस गळती होणार नाही व केस दाट होण्यास मदत होईल.


8) भाजलेल्या त्वचेसाठी कोरफड उपयुक्त


जर स्वयंपाक घरामध्ये जेवण करताना भाजले तर कोरफडीचा गर रोज त्या भागास लावल्यास जळजळ थांबेल व त्वचेला थंडावा मिळेल तसेच त्वचा पूर्ववत होण्यास मदत होईल.


टीप- जर आपणांस कोणतेतरी औषध चालू असेल तर त्यांनी कोरफडीचा रस किंवा त्याचा वापर करू नये तसेच लहान मुलांना म्हणजेच 15 वर्षाच्या आतील मुलांना कोरफडीचे सेवन करू देऊ नये. कोरफडीचे जास्त प्रमाणामध्ये सेवन करू नये नाहीतर त्याचे दुष्परिणाम होऊ लागतात. आपण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार कोरफडीचे सेवन केल्यास योग्य ठरेल.


9) Antiaging अँटीएजिंग प्रॉपर्टी 


कोरफडीमध्ये व्हिटॅमिन्स,मिनरल्स,सॅलिसिलिक ऍसिड,एंझाइम्स सारखे फायदेशीर घटक असतात जी त्वचा क्लीनजींग cleansing करण्यासाठी मदत होते म्हणजेच त्वचा साफ करण्यास मदत होते. 

ज्यांची स्किन ड्राय किंवा नॉर्मल आहे त्यांनी रोज रात्री झोपण्यापूर्वी  किंवा 2 तास कोरफडीचा आतील भाग म्हणजेच ताजा गर घेऊन त्यामध्ये 'व्हिटॅमिन इ' च्या कॅप्सूल चे 2 ड्रॉप टाकून चेहऱ्याला लावल्यास सुरकुत्या,रिंकल्स येण्यापासून सुटका होईल तसेच ऑईली स्किन असणाऱ्यांनी फक्त कोरफडीचा गर चेहऱ्याला  लावून सकाळी चेहरा धुतल्यास फायदा होईल.

बाजारामध्ये कोरफडीचे म्हणजेच एलो वेराचे वेगवेगळे प्रॉडक्ट्स पाहायला मिळतात, एलो वेरा फेस वॉश aloe vera face wash,एलो वेरा ज्यूस aloe vera juice,एलो वेरा साबण aloe vera soap,एलो वेरा क्रीम aloe vera cream.
एलो वेरा चा वापर आयुर्वेदिक प्रॉडक्ट्स मध्ये केला जात आहे कारण एलो वेराचे "Aloe Vera Information and Benefits" फायदे बरेच चांगले पाहायला मिळत आहेत कारण त्यात असणाऱ्या विविध गुणधर्मामुळे.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.