हळदीचे फायदे,उपयोग,प्रकार Turmeric Benefits,Types,Uses in Marathi
![]() |
Turmeric Benefits Types Uses in Marathi |
मागील लेखामध्ये आपण तुळस आणि कोरफड म्हणजेच aloe vera यांची सविस्तर पणे माहिती,त्यांचे उपयोग व वापरण्याच्या पद्धती पाहिल्या. आता आपण या लेखामध्ये turmeric म्हणजेच हळद याविषयी संपूर्ण माहिती 'Turmeric Benefits,Types,Uses in Marathi' पाहणार आहोत.
भारतीय संस्कृतीमध्ये हळदीला महत्वाचे स्थान दिले आहे कारण त्यामध्ये असणाऱ्या विविध गुणधर्मामुळे.
भारतीय संस्कृतीमध्ये हळद हि प्रत्येक घरामध्ये ठेवली जाते कारण तिचा उपयोग हा जेवणामधील प्रत्येक पदार्थामध्ये म्हणजेच भाजी,आमटी,वरण,सूप,सॅलड तसेच अन्य विविध पदार्थांमध्ये केला जातो.
हळदीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये आरोग्यविषयक औषधी गुणधर्म आहेत म्हणून आपल्या दैनंदिन जीवनात आपण हळद हि नेहमी वापरतो म्हणजेच जेवणामध्ये वापरण्यापासून ते सौंदर्यापर्यंत तसेच आरोग्यासाठी देखिल हळदीचा वापर केला जातो. म्हणून हळदीला आयुर्वेदामध्ये महत्वाचे स्थान दिले गेले आहे.
चला तर मग आपण हळद बद्दल माहिती जाणून घेऊयात.
आयुर्वेदामध्ये हळदीला 'हरिद्रा' या नावाने संबोधले जाते.मराठीमध्ये 'हळद' या नावाने ओळखले जाते तसेच इंग्रजीमध्ये 'Turmeric' या नावाने बोलले जाते.शास्त्रामध्ये हळदीला Curcuma longa-करक्युमा लाँगा असे संबोधले जाते.
हळदीमध्ये असणाऱ्या बहुपयोगी म्हणजेच antibacterial, antifungal,antioxidant,antiviral गुणधर्मामुळे तिचा वापर जेवणामध्ये तसेच आपले आरोग्य चांगले राहावे यासाठी केला जातो आणि नॉर्मली कोणाला कापले तर स्वयंपाकघरामधील हळदीचा डबा काढला जातो व त्यातील चिमूटभर हळद हि त्या जखमेवर लावली जाते कारण त्या ठिकाणी जंतुसंसर्ग होऊ नये म्हणून व रक्तप्रवाह जास्त होऊ नये यासाठी.
हळदीचे काही प्रकार types of turmeric आहेत त्यापैकी पांढरी हळद हि गुणकारी असून ती गोड असते म्हणून तिला 'आंबे हळद' म्हणून ओळखले जाते. तसेच दुसरी प्रसिद्ध असणारी हळद म्हणचे 'पिवळी हळद'. हळदीचा antibacterial म्हणून वापर केला जातो.
हळदीचे उत्पादन प्रामुख्याने महाराष्ट्र,आंध्रप्रदेश,तमिळनाडू तसेच ओरिसा अशा अनेक भागांमध्ये घेतले जाते. खासकरून हळदीची सांगली जिल्ह्यातील हरिपूर येथे मोठी बाजारपेठ उपलब्ध आहे.
हळद हि एक मसाल्यामधील एक प्रमुख नगदी पीक मानले जाते.हळद हि भारतीय वनस्पती असून आल्याच्या प्रजातीची पाच ते सहा फूट वाढणारे रोप आहे.
महत्व:-
धार्मिक महत्व
आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये हळदीला खूप महत्वाचे स्थान आहे.देवाची पूजा करण्याकरिता हळद कुंकू वाहिले जाते तसेच सत्यनारायण पूजेवेळी हळकुंड वापरले जाते व देवाला अभिषेक घालण्यासाठी देखील हळकुंडाचा वापर केला जातो.
औषधी हळदीचे बरेच उपयोग आहेत ते आपण पुढील प्रमाणे पाहू:
- जखम for - Injury
- सर्दी,खोकला - for Cough
- ऍसिडिटी आणि पोटातील जळजळ - for Acidity
- त्वचेसाठी हळद उपयुक्त - for Skin
- फेस पॅक म्हणून वापर - for Face pack
- त्वचेला ग्लो येण्यासाठी - for Glowing skin
- त्वचेवरील काळे डाग कमी होण्यास मदत होते - for Black spot
- रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत - Immunity Booster
- हळदीच्या दूधाचे फायदे - Turmeric Milk
- आयुर्वेद शास्त्रात हळदीचा वापर ताप, सर्दी, खोकला,थकवा,ब्रॉंकायटीज,जखमा बरे करणे,वजन कमी करणे,स्नायू मजबूत करणे,पोटातील जंत,त्वचेला खाज सुटणे अशा विविध समस्यांमध्ये हळद वापरली जाते.
टीप:- हा लेख हळदीच्या माहितीसाठी आहे, तसेच हा उपचार्थ सल्ला नाही.कृपया आयुर्वेदिक डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपण हळदीचा वापर करू शकता.
हळदीचे प्रकार Types of Turmeric in Marathi:
1) रान हळद
2) आंबे हळद
1)रान हळद/कस्तुरी हळद :-
रान हळदीला कस्तुरी हळद असे देखील संबोधले जाते. रान हळद हि एक हळदीची जात आहे.हि हळद मुख्यतः जंगलामध्ये आढळून येते.सध्या ती महाराष्ट्रामधील सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये आढळून येते. या हळदीचे कंद गोलाकार व मोठे असतात तसेच त्यांचा आतून नारंगी असतो व बाहेरून पिवळसर असतो
रान हळदीचे फायदे:-
रान हळदीचे फायदे हे मुख्यतः सूज आलेल्या भागावर त्याचा लेप करून लावल्यास सूज कमी येते व आराम मिळतो.
डोके दुखत असेल तर डोक्यावर रान हळदीचा लेप लावल्यास डोके शांत होण्यास मदत होते
2)आंबे हळदीचे फायदे :-
आंबे हळदीचा वापर हा सौंदर्यासाठी केला जातो. अंगावर पुरळ, पिंपल्स,काळे डाग असतील तर अशा ठिकाणी आंबे हळद व दुधाची साय/शाई एकत्र करून त्याचा लेप त्या जागेवर लावावा व थोड्या वेळाने चेहरा स्वच्छ करावा असे काही दिवस केल्यावर फरक जाणवेल.
तसेच ज्या भागावर सूज आली असेल अशा ठिकाणी आंबे हळदीचा लेप लावल्यास आराम मिळतो."Turmeric Benefits,Types,Uses in Marathi"
टीप : ज्या लोकांना हळदीची ऍलर्जी असेल अशा लोकांनी हे उपाय करू नयेत. प्रमाणापेक्षा जास्त हळदीचा वापर करू नये किंवा शारीरिक व्याधींसाठी हळदीचा वापर करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणं महत्त्वाचे आहे. कारण हळदीच्या अती वापरामुळे मळमळ,उल्टी, पोटामध्ये जळजळ होऊ शकते.
हेल्थ टिप्स:- बदलत्या हवामानामध्ये 'या' घरगुती आरोग्य टिप्स घेतील तुमची काळजी, जाणून घ्या एका क्लीकवर.
हि कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही तसेच कोणत्याही शासनाशी निगडित वेबसाईट नाही. तरीही कोणी या वेबसाईटला official वेबसाईट समजू नका. कोणीही कमेंट मध्ये आपला आधार कार्ड नंबर तसेच मोबाईल नंबर टाकू नका किंवा वैयक्तिक माहिती सांगू नका. आम्ही कोणत्याही सरकारी योजनेतील तक्रारींवर लक्ष देऊ शकत नाही. तसेच या संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीबद्दल अधिकृत माहिती आपल्याला हवी असल्यास official वेबसाईटला संपर्क करा अशी मी विनंती करतो. धन्यवाद!