तुळशीचे फायदे आणि माहिती मराठी –Tulsi Benefits and Information in Marathi
Aushadi Vanasptinche Upyog Aani Fayade in Marathi
यालेखामध्ये आपण तुळस या औषधी वनस्पतीचे उपयोग आणि फायदे मराठी मध्ये पाहणार आहोत. हि अशी वनस्पती आहेत की जिचा आपल्या रोजच्या जीवनामध्ये अतिशय महत्वपूर्ण उपयोग ठरत आहे. चला तर मग आपण जाणुन घेऊयात या औषधी वनस्पतीचा उपयोग तुळशीची माहिती मराठी – Tulsi Information in Marathi
- तुळस(Basil)
तुळस हि अशी एक पवित्र औषधी वनस्पती आहे , जी की भारतातील प्रत्येक घरामध्ये,घरासमोरील कुण्डी मध्ये किंवा अंगनामध्ये आढ़ळली जाते तसेच तुळस असणे हे देखील शुभ मानले जाते. तुळशीमुळे घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाते व सकारात्मक ऊर्जा निर्माण होते.तुळशीला महाराष्ट्रामध्ये महत्वाचे स्थान आहे कारण याचे बरेच असे बहुपयोगी फायदे आपल्याला पहायला मिळतात, पुढे आपण तुळशीचे फायदे आणि माहिती पाहणार आहोत तेही संपूर्ण मराठीमध्ये. 'Tulsi Benefits and Information in Marathi'
![]() |
Tulsi Benefits and Information in Marathi |
औषध वनस्पती तुळस व त्याबद्दल माहिती मराठी – Tuls Information in Marathi
तुळशीच्या विविध आयुर्वेदिक गुणधर्मामुळे तुळशीला आयुर्वेदामध्ये खुप महत्वाचे स्थान दिले गेले आहे. Tulsi Information in Marathi हिंदू धर्मामध्ये तुळशीची नित्यनेमाने पुजा केली जाते. त्याचबरोबर आपण देवाची पूजा केल्यानंतर तुळशीची देखील पूजा करतो. तुळशीसमोर पूजा केल्यावर शुभंकरोती मधील एक वाक्य बोलले जाते ते म्हणजे “दिवा लावला देवापाशी , उजेड पडला तुळशीपाशी”.
भारतामध्ये तुळशीला देवाचे स्वरुप मानले जाते.
तुळशीचेफायदे – Tulshiche Fayade in Marathi
तुळशीचे विविध प्रकारचे आरोग्यविषयक फायदे आहेत त्यापैकी एक म्हणजे तुळशीपासून ऑक्सिजनचा पुरवठा होतो. Tulsi Benefits in Marathi तुळशीच्या अशा आणि विविध गुणधर्मामूळे तुळशीचे आयुर्वेदामध्ये म्हणजेच आरोग्यविषयक अतिशय चांगले महत्व दिले आहे.तुळशीची पाने अतिप्रमाणात खाऊ नये, तुळशीच्या पानांसोबतच तुळशीच्या मंजिरीचे देखील फायदे आहेत ते पुढीलप्रमाणे,
तुळशीमुळे रोगप्रतिकारक शक्ति सुधारण्यास मदत होते त्यामुळे सर्दी किंवा खोकला लागला की तुळशीच्या पानांचा काढ़ा दिला जातो.तसेच खोकला येत असेल तर तुळशीची पाने व खडीसाखर खाल्ल्यास खोकला कमी होण्यास मदत होते.
2.त्वचाविकार
त्वचेच्या प्रॉब्लेम साठी तुळस अत्यंत गुणकारी मानली जाते. तुळशीमध्ये antifungal, antiallergic प्रॉपर्टी असतात. उदाहरणार्थ,अंगाला खाज सुटत असेल तर तुळशीच्या पानांचा रस लावल्यास आराम मिळतो.नायटा सारखे म्हणजे चेहऱ्यावर पांढरे चट्टे झाल्यासारखे होते अशा वेळेस तुळशीच्या पानांचा रस करून लावल्यास फायदा होतो.
3.मुखदूर्गंधी पासून बचाव
दररोज तुळशीची एक किंवा दोन पाने खाल्ली की मुखदूर्गंधी पासून बचाव होतो.
4.घशाच्या समस्येसाठी देखील तुळस उपयोगी
तुळशीच्या पानाचा रस करून तो रस कोमट पाण्यामध्ये टाकून मिसळून गुळण्या केल्यास घसा दुखण्याच्या समस्येपासून सुटका मिळेल. हे घसा शांत करण्यास आणि दमा आणि ब्राँकायटिसची लक्षणे कमी करण्यास देखील मदत करू शकते.
5.तनावासाठी तुळशीची पाने उपयोगी
तुळशीमध्ये असा एक गुणधर्म आहे की तो म्हणजे एंटीस्ट्रेस. जे स्ट्रैस पासून आराम देतात. तुळशीच्या पानाचे रोज प्रमाणामध्ये सेवन केल्यास शरीराच्या पेशी डिटॉक्सिफाई होण्यास मदत होते, यामुळे डोके शांत राहते व मानसिक तनाव कमी होण्यास मदत होते.
6.पोटाची समस्या
तुळशीचे पान खाल्ल्याने पोटाचे विकार होत नाहीत.
7. श्वासोच्छवासाचे आरोग्य
तुळशीमध्ये कफ पाडणारे गुणधर्म आहेत आणि खोकला, सर्दी आणि रक्तसंचय यासारख्या श्वसनाच्या स्थितीपासून मुक्त होण्यास मदत करतात. तसेच तुळस हि कफ आणि वात यांचा नाश करणारी आहे, त्यामुळे तुळशीच्या पानाचे चूर्ण व मध एकत्र करून पिल्यास कफ कमी होतो.
8.कमी वयामध्ये वयस्करपणा वाढीवर उपाय
तुळशीमध्ये जीवनसत्वे अ आणि ब हे चांगले एंटी ऑक्सीडेंट नी भरलेले असतात त्यामूळे शरीरास तजेलदार आणि टवटवीत ठेवण्यास मदत मिळते. पाण्यासोबत तुळशीच्या पानांचा रस घेतल्यास शरीरातील विविध संस्था योग्य पद्धतीने कार्य करतात त्यामूळे शरीरास वृध्दावस्था लवकर येत नाही.
9. पचन क्रिया वाढवते
तुळशीचा चहा तुमच्या तुमच्या पाचन क्रियेची चालना मजबूत करते.तुळशीच्या चहामध्ये शून्य कॅलरीज असतात की ज्यामुळे तुमची तग धरण्यास मदत होते.
10.उष्णता दूर होण्यास मदत
तुळशीच्या बिया आरोग्यासाठी अत्यंत लाभदायी आहेत.तुळशीच्या बियांचे सेवन केल्यास पोटातील उष्णता कमी होऊन थंडावा मिळतो.तुळशीच्या बिया पाण्यामध्ये भिजवून त्यानंतर त्या बिया दुधामध्ये मिसळून सेवन करावे,असे सांगण्यात येते.
11. अजुन काही तुळशीचे फायदे आहेत ते पुढीलप्रमाणे:-
- दमा व कोरडा खोकला असेल तर तो देखील कमी होण्यास मदत होते.
- अपचनाचा त्रास असेल तर तुळशीचे पान खाल्ल्यास आराम मिलतो .
- कावीळसाठीदेखील तुळस फायदेशीर आहे.
- कुष्ठरोगासाठीदेखील तुळशीचा रस फायदेशीर आहे.
- पांढरे डाग दूर होण्यास मदत होते.
- स्मरण शक्तिसाठी तुळशीची पाने फायदेशीर असतात.
- मलेरियामध्ये फायदेशीर.
- तुळशीची रोपे भरपूर लावल्यास डासांचा प्रादुर्भाव होत नाही.
- तुळस ही हवा शुद्ध करण्याचे काम करते.
तुळशीचे प्रकार (Types of Basil)
1. राम तुळस
राम तुळशीला हिरव्या पानांची तुळस देखील म्हणतात.या तुळशीची पाने गोड असतात.राम तुळशीला लवंगसारखा सुगंध येतो त्यामुळे या तुळशीला लवंगी तुळस असे देखील म्हणतात.राम तुळस भगवान श्री रामांना अतिशय प्रिय आहे.आपल्या घरामध्ये राम तुळशीचे रोप रावल्यास घरामध्ये सुख,शांती व ऐश्वर्य लाभते.राम तुळस घरामध्ये असणे चांगले व शुभ मानले जाते.
2. वन तुळस
या तुळशीचा सुगंध अतिशय तीव्र असा असून ही तुळस विशेष औषधी आहे.पानांचा चोथा त्वचाविकारांवर वापरला जातो तसेच जखम भरण्यासाठी देखील या तुळशीच्या पाल्याचा वापर केला जातो.
3. श्रीकृष्ण तुळस
श्रीकृष्ण तुळस घरी लावणे खूप लाभदायी मानले जाते.आयुर्वेदामध्ये या तुळशीला खूप महत्व दिले गेले आहे.या तुळशीच्या पानांचा रंग जांभळा किंवा काळा असतो.तसेच मंजिऱ्या कमीअधिक जांभळ्या रंगाच्या असतात.हि तुळस भगवान श्री कृष्णांशी संबंधित आहे.या तुळशीचे पाने खाल्ल्यास खोकला,ताप यावर आराम मिळू शकतो.
4.कापूर तुळस
या तुळशीच्या पानांना कापुरसारखा सुगंध येतो.सर्दी,कफ आणि खोकला यावर कापूर तुळस खूप फायदेशीर ठरते.हर्बल टी बनविण्यासाठी कापूर तुळस उपयुक्त ठरते.
याचबरोबर अजून काही प्रकार आहेत ते पुढीलप्रमाणे,
5. विष्णु तुळस
6.लेमन तुळस
अशाप्रकारे तुळशीची माहिती आपणांस पाहता येईल.
हा लेख जर आपणांस आवडला तर इतरांना नक्की पाठवा कारण त्यांना देखील तुळशीबद्दल आरोग्यदायी माहिती आपणांमुळे मिळेल.
टिप:- तुळशीचे पान अतिप्रमाणात खाऊ नये.
हि कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही तसेच कोणत्याही शासनाशी निगडित वेबसाईट नाही. तरीही कोणी या वेबसाईटला official वेबसाईट समजू नका. कोणीही कमेंट मध्ये आपला आधार कार्ड नंबर तसेच मोबाईल नंबर टाकू नका किंवा वैयक्तिक माहिती सांगू नका. आम्ही कोणत्याही सरकारी योजनेतील तक्रारींवर लक्ष देऊ शकत नाही. तसेच या संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीबद्दल अधिकृत माहिती आपल्याला हवी असल्यास official वेबसाईटला संपर्क करा अशी मी विनंती करतो. धन्यवाद!