प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना PMJJBY Policy

आता मिळावा 2 लाखांचा विमा

तोही 330 रुपयांमध्ये

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा

योजना ( PMJJBY Policy)


PMJJBY Policy ।

PMJJBY Premium ।

PMJJBY Age Limit ।

PMJJBY Benefits ।


प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना

PMJJBY हि भारत सरकारद्वारे सुरु करण्यात आलेली योजना असून प्रती वर्षी प्रीमियम फक्त 330/- रुपये चा आहे की जो 2 लाख रुपये पर्यंतचा मृत्यू कवच प्रदान करतो.
हा 330/- रुपयेचा प्रीमियम ग्राहकांच्या बँक खात्यामधून स्वयं डेबिट केले जातात.
हि योजना सर्व भारतीयांसाठी आहे आणि ज्यांचे बँकेमध्ये खाते असेल व ज्यांनी हि योजना चालू करण्यासंबंधी संमती दर्शविली आहे अशा लोकांना ह्या योजनेचा लाभ घेता येईल.

PMJJBY POLICY
PMJJBY POLICY



योजनेचा कालावधी

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा PMJJBY योजनेचा कालावधी हा 1 जून ते 31 मे या एक वर्षाच्या कालावधीपर्यंत असतो व त्याचे परत नूतनीकरण करता येते.

योजनेचा फायदा कधी व कसा मिळू शकतो

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा PMJJBY Policy योजनेच्या कालावधीमध्ये जर विमाधारकाचा मृत्यू झाल्यास नामांकित व्यक्तीला म्हणजेच त्याच्या वारसाला मृत्यू कव्हरेज रुपये 2 लाख मिळेल. बँक किंवा विमा कंपनीमध्ये ऑनलाईन किंवा ऑफलाईन दावा केला जाऊ शकतो.


PMJJBY ची वैशिष्ट्ये 

PMJJBY Age Limit

PMJJBY Premium


  • प्रीमियम 330/- रुपये.

  • विमा/मृत्यू कवच 2 लाख रुपये.

  • 18 ते 50 वर्षे वयोगटातील लोकांसाठी कव्हरेज.

  • बँक खात्यामधून स्वयं डेबिटची सोय.

  • नूतनीकरण प्रत्येक वर्षी करता येते.

  • ऑनलाईन किंवा ऑफलाईन क्लेम किंवा दावा सबमिट करता येतो.

नाव नोंदणी

PMJJBY योजनेमध्ये नाव नोंदणीसाठी सहभागी बँका किंवा विमा कंपनी यांच्या द्वारे नावनोंदणी करू शकता.

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेचे फायदे

PMJJBY Benefits

  • एखाद्या व्यक्तीचा अचानक किंवा अकाली मृत्यू झाल्यास त्याच्या वारसाला 2 लाखांचा विमा कवच मिळू शकतो म्हणजेच त्याच्या कुटुंबाला आर्थिक सुरक्षा कवच मिळते.

  • नाव नोंदणीची प्रक्रिया अत्यंत सुलभ रितीने आहे.

  • प्रीमियम देखील सर्वांना परवडेल अशा किंमतीमध्ये आहे.

  • ऑनलाईन किंवा ऑफलाईनद्वारे सबमिशन करता येते.

अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या संमतीने हा PMJJBY हा विमा चालू करू शकता कि ज्यामुळे आपल्या कुटुंबाला एक सुरक्षा कवच मिळू शकते.

टीप:- अधिक माहितीसाठी सरकारच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

लेक लाडकी योजनेच्या माहितीसाठी समोरील लिंक वर क्लिक करा: Link

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.