लेक लाडकी योजना :
Lek Ladki Yojana 2023।
Lek Ladki scheme।
Maharashtra Lek
Ladki Yojana। लेक
लाडकी योजना 2023 अर्ज
प्रक्रिया संपूर्ण माहिती मराठी
![]() |
Lek Ladki Yojana |
महाराष्ट्र शासन हे विविध प्रकारच्या योजना आपल्या राज्यामध्ये राबवत असून महाराष्ट्र शासन हे आपल्या राज्यातील मुलींच्या उज्वल भविष्यासाठी वेगवेगळ्या योजना आणत आहे त्यापैकी एक म्हणजे लेक लाडकी lek ladki yojana 2023 जी वर्ष 2023 मधील अर्थसंकल्पामध्ये घोषीत करण्यात आली.याच योजनेविषयी आपण माहिती पाहणार आहोत.
मुलींच्या सक्षमीकरणासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने लेक लाडकी lek ladki yojana योजना सुरु करण्याचा एक महत्वाचा निर्णय 2023 मधील अर्थसंकल्पात घेतला आहे.
योजनेचे नाव : लेक लाडकी योजना
राज्य : महाराष्ट्र
विभाग : विभाग अजून ठरविण्यात आला नाही
लाभ : रुपये 98,000 (आर्थिक सहाय्य)
लाभार्थी : आर्थिक दृष्टया गरीब कुटुंबातील मुली
उद्देश : मुलींचा आर्थिक तसेच सामाजिक विकास करणे.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन किंवा ऑफलाईन
लेक लाडकी योजनेची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे:
Features of lek ladki yojana
- राज्यातील मुलींच्या जीवनामध्ये बदल घडवून आणणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे.
- या योजनेमुळे राज्यातील मुलींची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत मिळेल.
- अर्ज प्रक्रिया अत्यंत सुलभ ठेवली आहे जेणेकरून मुलींना अर्ज करताना कोणत्याच समस्येचा सामना करावा लागणार नाही.
- तसेच लेक लाडकी योजनेमुळे मुलींचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होईल.
- या योजनेच्या सहाय्यामुळे आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणाऱ्या मुलींच्या पालनपोषणाचा,शिक्षणाचा खर्च करणे सोपे होणार आहे.
- या योजनेमुळे मुलींचे जीवनमान सुधारण्यासाठी आणि मुलींना सशक्त व आत्मनिर्भर बनविण्यासाठी तसेच त्यांना आर्थिक विकासासाठी हातभार लावण्यासाठी हि योजना अतिशय महत्त्वाची असणार आहे.
- ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार पालकांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.त्यामुळे त्यांचा वेळ वाचेल.
- असे शक्य नसल्यास जिल्ह्यातील महिला व बालविकास विभागात जाऊन लेक लाडकी योजनेचा फॉर्म घेऊन त्यामध्ये विचारलेली माहिती भरून लागणारी योग्य ती आवश्यक कागदपत्रे त्या फॉर्मला जोडावीत.
- या योजनेमध्ये दिला जाणारा लाभ हा त्या मुलीच्या बँक खात्यामध्ये DBT च्या सहाय्याने जमा करण्यात येणार आहे.
टीप- लेक लाडकी योजना हि समाजातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील मुलींच्या साठी सरकारने आणली आहे, त्यामुळे हा लेख अशा गरजू कुटुंबापर्यंत पोहचवा कि जे मुलींच्या शिक्षणासाठी आर्थिक दृष्ट्या कमकुवत असतील कि ज्यांना ह्या योजनेचा नक्कीच फायदा होईल.त्यामूळे हे artical आपण इतरही groups मध्ये पाठवा.
लेक लाडकी योजनेअंतर्गत दिले जाणारे अर्थसहाय्य पुढीलप्रमाणे:
- मुलीचा जन्म झाल्यावर : रुपये 5000/- मिळणार आहेत. हे पैसे तीन टप्यांमध्ये मिळतात
त्यामध्ये :
- मुलीचा जन्म झाल्यावर 1,000/- रुपये खात्यावर जमा केले जातात.
- त्यानंतर मुलगी साडेतीन महिन्याची झाल्यावर 2,000/- रुपये जमा केले जातात.
- तिसऱ्या टप्पा हा मुलगी 5 महिन्याची झाल्यावर उरलेले 3,000/- रुपये जमा केले जातात.
अशा पद्धतीने पहिला टप्पा हा 5,000/- रुपये चा असतो.
त्यानंतर पुढील टप्पे कसे मिळतात ते पाहूयात-
- मुलगी पहिलीला गेल्यावर 4,000/- रुपये देण्यात येणार आहेत.
- मुलगी सहावीला गेली असता 6,000/- रुपये मिळणार आहेत.
- मुलगी अकरावीला गेल्यावर 8,000/- रुपये मिळणार आहेत.
- मुलगी 18 वर्षांची झाल्यावर 75,000/- रुपये मिळणार आहेत.
या लेक लाडकी योजनेचे लाभार्थी कोण असतील ते पाहूयात: Lek Ladki Yojana Beneficiary
- ज्या कुटुंबाचे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल अशा कुटुंबातील मुली या लेक लाडकी योजनेचा लाभ घेऊ शकतात.
लेक लाडकी योजनेचे लाभ Lek Ladki Yojana Benefits:
- या योजनेअंतर्गत मुलींना त्यांच्या शिक्षणासाठी हातभार लागणार आहे.
- या योजनेअंतर्गत मुलींना 98,000/- रुपयांचे आर्थिक सहाय्य मिळणार आहे जेणेकरून मुली आपले शिक्षण पूर्ण करू शकतील.
- या योजनेमुळे मुली स्वतःच्या पायावर उभे राहू शकतील त्याचबरोबर कोणावर अवलंबून राहण्याची वेळ येणार नाही.
- त्यामुळे मुली स्वावलंबी बनतील.
- समाजात मुलींबद्दल असलेले नकारात्मक विचार बदलून सकारात्मक विचार निर्माण होतील.
- आत्मविश्वास देखील वाढेल तसेच या योजनेमुळे मुली आत्मनिर्भर देखील बनतील.
- या योजनेमुळे मुलींचे जीवनमान सुधारण्यास मदत होईल.
- सगळ्यात महत्वाचे म्हणजे या योजनेमुळे मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळेल.
हे पण वाचा: Mazi Kanya Bhagyashree Yojana Marathi - माझी कन्या भाग्यश्री योजना
या योजनेसाठी काही अटी आहेत त्या पाहूयात:
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वात प्रथम त्या मुलीचा जन्म हा महाराष्ट्रामध्ये झाला पाहिजे म्हणजेच मुलगी हि महाराष्ट्र राज्याची रहिवासी असावी.
- तसेच मुलीच्या कुटुंबाकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असणे गरजेचे आहे.
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी त्या मुलीला तिचा स्वतःचा बँक खाते माहिती देणे आवश्यक आहे.
- "Lek ladki yojana" लाभ ज्या मुलीच्या घरचे आई किंवा वडील सरकारी नोकरी करत असतील तर त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
- जर कोणी अर्जामध्ये खोटी माहिती भरल्यास अशा वेळी या योजनेचा लाभ घेता येणार नाही तसेच एकच अर्ज जमा करावा दोन अर्ज जमा केल्यास एक अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही.
लेक लाडकी योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे:Documents for Lek ladki yojana
- मुलीचे जन्मप्रमाण पत्र
- आधारकार्ड
- पिवळे किंवा केशरी रेशनकार्ड
- रहिवासी दाखला
- मुलीचे बँक खाते पासबुक किंवा मुलीचे बँक खाते नसेल तर अशा वेळी तिच्या आई वडिलांच्या बँक खात्याचा तपशील
- ईमेल आयडी
- मोबाईल नंबर
- पासपोर्ट साईज फोटो.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कोणत्या पद्धतीने करायचा ते पाहू: Application Process of Lek ladki yojana
लेक लाडकी योजना अधिकृत वेबसाइट
या योजनेसाठी अर्ज कोणत्या पद्धतीने करायचा यासाठी तुम्हाला अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. त्याची संपूर्ण माहिती अधिकृत वेबसाइटला भेट देऊनच मिळू शकते. ज्यासाठी थोडा वेळ लागेल. कारण यासाठी ऑनलाईन वेब पोर्टल Maharashtra Lek Ladki Yojana Registration Portal सुरु होईल आणि ठिकठिकाणी कार्यालय व कॅम्प उपलब्ध होतील जेणेकरून आपण सहजरित्या ह्या योजनेसाठी अर्ज करू शकाल. ह्याव्यतिरिक्त आम्ही आपणास registration कसे करावे हे थोडक्यात सांगितले आहे.याबद्दल अधिकृत माहिती आम्हाला कळताच आम्ही तुम्हाला अपडेट करू.
अर्जदाराने शासनाच्या अधिकृत वेबसाईट वर जावावे.
होम पेज वर गेल्यावर Registration वर क्लीक करावे.
त्यानंतर तुमच्यासमोर Registration पेज उघडेल त्यामध्ये अर्जदाराला त्यांचा मोबाईल नंबर व पासवर्ड टाकून Registration करावे लागेल.
यानंतर Registration ची प्रोसेस पूर्ण होईल.
होमपेज वर लेक लाडकी योजनेवर क्लीक करावे.
त्यानंतर लेक लाडकी योजनेचा फॉर्म दिसेल त्यामध्ये अर्जदाराला विचारलेली आपली संपूर्ण माहिती त्या फॉर्म मध्ये भरावी लागेल.
त्यानंतर कागदपत्रे अपलोड करावे लागतील.
कागदपत्रेअपलोड केल्यावर सेव्ह save या बटनावर क्लीक करावे जेणेकरून या योजनेची अर्ज प्रक्रिया पूर्ण होऊ शकेल.
लेक लाडकी योजना
MAHA BUDGET 2023
हि कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही तसेच कोणत्याही शासनाशी निगडित वेबसाईट नाही. तरीही कोणी या वेबसाईटला official वेबसाईट समजू नका. कोणीही कमेंट मध्ये आपला आधार कार्ड नंबर तसेच मोबाईल नंबर टाकू नका किंवा वैयक्तिक माहिती सांगू नका. आम्ही कोणत्याही सरकारी योजनेतील तक्रारींवर लक्ष देऊ शकत नाही. तसेच या संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीबद्दल अधिकृत माहिती आपल्याला हवी असल्यास official वेबसाईटला संपर्क करा अशी मी विनंती करतो. धन्यवाद!