माझी कन्या भाग्यश्री योजना ।
Mazi Kanya
Bhagyashree Yojana ।
Mazi Kanya
Bhagyashree Yojana
Maharashtra। मुलींसाठी
सरकारी योजना
![]() |
Mazi Kanya Bhagyashree Yojana |
महाराष्ट्र राज्य सरकार आपल्या राज्यातील मुलींसाठी वेगवेगळ्या योजना आणत आहे त्यापैकीच 'माझी कन्या भाग्यश्री योजना' Mazi Kanya Bhagyashree Yojana हि एक योजना आहे.या योजनेविषयी माहिती आपण या लेखामध्ये पाहणार आहोत.
महाराष्ट्र राज्यातील मुलींना शिक्षण घेता यावे, बालिका भ्रूणहत्या रोखण्यासाठी,त्यांचे आरोग्य चांगले राहणेसाठी,मुलींचे उज्वल भविष्य होणेसाठी, मुलींबद्दल जे नकारात्मक विचार आहेत त्या विचारांमध्ये सकारात्मकता येणेसाठी तसेच मुलींना आर्थिकदृष्टया स्वावलंबी बनविणेकरिता अशा योजनांचा समावेश केला जात आहे. हि योजना 1 ऑगस्ट 2017 पासून सुरु करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्यामध्ये बहुतांश कुटुंब हि दारिद्र्य रेषेखाली आहे.त्यामधील काहींना त्यांच्या मुलींसाठी योग्य शिक्षण देणे शक्य होत नाही.त्यामुळे अशा कुटुंबातील मुली या शिक्षणापासून दूर राहतात किंवा त्यांना चांगले शिक्षण मिळत नाही.त्यामुळे मुलींची भ्रूणहत्या वाढते. असे जे काही नकारात्मक विचार आहेत त्यांचे सकारात्मक विचार होण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने Mazi Kanya Bhagyashree Yojana योजना आणून एक चांगला निर्णय घेतला आहे.
याचप्रमाणे 'बेटी बचाओ,बेटी पढाओ' हि योजना फेब्रुवारी 2014 पासून सुरु करण्यात आली आहे. तर ज्या जिल्ह्यांमध्ये मुलींचे प्रमाण कमी आहे अशा जिल्ह्यांमध्ये हि योजना लागू करण्यात आली आहे. तर या योजनांसाठी भारतातील 100 जिल्ह्यांची निवड केली गेली होती त्यानंतर सुकन्या योजनेचे जे लाभ आहेत ते कायम ठेवून सुधारित माझी कन्या भाग्यश्री योजना हि 1 ऑगस्ट 2017 पासून सुरु करण्यात आली.
उद्देश:
'Mazi Kanya Bhagyashree Yojana' या योजनेचा मुख्य उद्देश असा आहे की, राज्यातील मुलींचा जन्मदर वाढेल, जेणेकरून बालविवाहास प्रतिबंध येईल. त्यामुळे मुलींचे शिक्षण पूर्ण होऊ शकेल आणि त्यांचा आरोग्याचा दर्जा चांगला राहू शकेल.
टीप:- हा लेख आवडल्यास इतरही आपल्या संपर्कातील लोकांना किंवा कुटुंबांना पाठवा जेणेकरून या योजनेचा फायदा इतरही कुटुंबांना म्हणजेच त्या कुटुंबातील मुलींना होऊ शकेल.
- योजनेचे नाव : माझी कन्या भाग्यश्री योजना
- राज्य : महाराष्ट्र
- योजनेची सुरू झालेची तारीख : 1 ऑगस्ट 2017
- विभाग : बाल विकास विभाग
- लाभार्थी : आर्थिक दृष्टया गरीब असणारी कुटुंब
- उद्देश : महिलांना स्वावलंबी बनवणे व आर्थिक दृष्ट्या बळकट करणे.
माझी कन्या भाग्यश्री योजनेची उद्दिष्टे:
- भ्रूणहत्या थांबवणे.
- बालविवाहास प्रतिबंध करणे.
- मुलींच्या चांगल्या जीवनात्मक सुरक्षेबद्दल खात्री देणे.
- मातेच्या गर्भधारणेच्या वेळेस लिंग निवडीस प्रतिबंध करणे.
- मुलींचा जन्मदर वाढविणे, आर्थिकदृष्ट्या बळकट करणे, स्वावलंबी बनविणे,शिक्षणास प्रोत्साहन देणे.
- मुलींचे आरोग्य चांगले ठेवण्यावर भर देणे.
- मुलींच्या जन्माबाबत सकारात्मक विचार निर्माण करणे.
लाभार्थी:
माझी कन्या भाग्यश्री योजनेची दोन प्रकारच्या लाभार्थ्यांना लाभ देण्यात येईल.
नंबर 1 किंवा प्रकार 1 : एकुलती एक मुलगी आहे व मातेने कुटुंब नियोजन केले आहे.
नंबर 2 किंवा प्रकार 2 : पहिली मुलगी आहे व दुसरीही मुलगी असेल तर त्यानंतर कुटुंब नियोजन केले असेल तर प्रकार 2 चे लाभ हे त्या दोन्ही मुलींना लागू असतील.
मात्र एक मुलगा व एक मुलगी असेल तर अशा परिस्थितीत लाभ दिला जात नाही.
माझी कन्या भाग्यश्री योजना अटी व नियम:
- माझी कन्या भाग्यश्री योजनेचा लाभ मिळविण्यासाठी आईवडिलांनी कुटुंबनियोजनाचे प्रमाणपत्र अर्जासोबत सादर करणे गरजेचे आहे.
- या योजनेचा लाभ हा 1 ऑगस्ट 2017 रोजी जन्मलेल्या मुलींना आणि 1 ऑगस्ट 2017 नंतर जन्मलेल्या मुलींसाठीच असेल.
- जर एखाद्या आईवडिलांना एक मुलगा व एक मुलगी असेल किंवा पहिली मुलगी व नंतर मुलगा असेल तर त्यांना Mazi Kanya Bhagyashree Yojana या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
- या योजनेअंतर्गत कुटुंबातील फक्त पहिल्या दोनच मुलींना या योजनेचा लाभ घेता येईल.
- लाभार्थ्यांचे आईवडील हे महाराष्ट्राचे मूळ रहिवासी असले पाहिजेत.
- दुसऱ्या प्रसूतीच्या वेळेस जर मातेने जुळ्या मुलींना जन्म दिला तर त्या दोन्ही मुलींना या योजनेचा लाभ घेता येईल.
- माझी कन्या भाग्यश्री योजना आधारकार्डसोबत लिंक करण्यात येईल.
- मुलीचे लग्न हे 18 वर्षाच्या आगोदर झाले तर या योजनेचा लाभ मिळणार नाही.
- मुलगी दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- कोणत्याही कारणास्तव मुलीचे शाळेमधून नाव काढले तर माझी कन्या भाग्यश्री योजनेचा लाभ घेता येत नाही.
- लाभार्थीचे स्वतंत्र बँकेत खाते उघडण्यात येईल.
- पहिल्या मुलीच्या जन्मानंतर मातेने एक वर्षाच्या आत कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया करणे अनिवार्य आहे.
- एक वर्षानंतर कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया केल्यास या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
- लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 7.5 लाखापेक्षा कमी असणे अनिवार्य आहे.
- अर्ज जमा करताना मुलीचा जन्माचा दाखला अर्जासोबत जोडणे गरजेचे आहे.
- या योजनेमधून मुलीला तिच्या 18 वर्षानंतर जे 1 लाख रुपये मिळणार आहेत त्यातील 10,000/- रुपये हे मुलीच्या कौशल्य विकासावर खर्च करणे गरजेचे आहे. त्यामुळे या कौशल्याच्या जोरावर मुलीला रोजगार मिळून मुलगी स्वतःच्या पायावर उभी राहू शकेल किंवा कायमस्वरूपी उत्पन्न चालू राहू शकेल.
या योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे:
- लाभार्थ्यांचे वडील हे महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे बंधनकारक आहे आणि महाराष्ट्र राज्याचे रहिवासी प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.
- मुलीचे जन्म नोंदणी प्रमाणपत्र
- लाभार्थी कुटुंबाने जर दुसऱ्या मुलीच्या जन्मानंतर अर्ज केला असेल तर दुसऱ्या मुलीच्या जन्मानंतर 6 महिन्याच्या आतमध्ये कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया केल्याचा दाखला जोडणे आवश्यक आहे.
- सावित्रीबाई फुले योजनेचा लाभ न घेतलेचा दाखला
- मुलीचे आधारकार्ड
- रहिवासी प्रमाणपत्र
- घरामधील एक मोबाईल क्रमांक
- वार्षिक उत्पन्न 7.5 लाखाच्या आत असलेला दाखला
- पासपोर्ट साईज फोटो.
माझी कन्या भाग्यश्री योजनेअंतर्गत अर्ज करण्याची योग्य पद्धत..
Majhi Kanya Bhagyashree Yojana Registration Online
Mazi Kanya Bhagyashree Yojana या योजनेअंतर्गत लाभाकरिता मुलीच्या पालकांनी मुलीचा जन्म झाल्यावर संबंधित ग्रामपंचायत / नगरपालिका / महानगरपालिका या ठिकाणी मुलीच्या नावाची नोंदणी करून राहत असलेल्या त्या क्षेत्रातील अंगणवाडी सेविकेकडे अर्ज सादर करावा लागेल.
अर्जासोबत वडील महाराष्ट्र राज्याचे मूळ रहिवाशी असल्याचा पुरावा, (अधिवास प्रमाणपत्र) आणि जन्म नोंदणी प्रमाणपत्र, दारिद्रय रेषेखालील असल्याचा पुरावा (रेशन कार्ड / उत्पन्नाचा दाखला), लाभार्थी कुटुंबाने पहिल्या अपत्याच्या (मुलगी) जन्मानंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केली असल्याबाबतचे प्रमाणपत्र सादर करावे. तसेच दुसरे अपत्य असलेल्या मुलीसाठी अर्ज करतांना कुटुंब नियोजन शस्त्रकिया केली असल्याबाबतचे वैदयकीय अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र, ही कागदपत्रे सादर करावीत.
"Mazi Kanya Bhagyashree Yojana" या योजनेसाठी लागणारी आवश्यक अर्ज राज्यातील प्रत्येक ग्रामीण व नागरी बाल विकास प्रकल्प अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (बाल कल्याण), जिल्हा परिषद, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, विभागीय उपायुक्त (महिला बाल विकास) यांच्या कार्यालयात विनामूल्य उपलब्ध असतील.
किंवा
राज्यातील इच्छुक लाभार्थ्यांना ज्यांना अर्ज करावयाचा असेल किंवा ज्यांना या योजनेचा लाभ मिळवायचा असेल त्यांनी महाराष्ट्र राज्याच्या अधिकृत संकेतस्थळावर Official Website वर जाऊन अर्जाचा फॉर्म पीडीएफ PDF स्वरूपामध्ये आहे,त्याची प्रिंट काढून त्यामध्ये विचारलेली सर्व माहिती भरून व त्यासोबत योग्य ती कागदपत्रे जोडून जिल्ह्याच्या महिला व बालविकास कार्यालयात जमा करावे लागेल.
सदर अर्जाची पडताळणी अंगणवाडी सेविका करतात आणि अंगणवाडी सेविका मुख्यसेविकेकडे सादर करतात. अंगणवाडी पर्यवेक्षिका किंवा मुख्यसेविका सदर अर्जाची व प्रमाणपत्रांची तपासणी करुन प्रत्येक नागरी प्रकल्पाबाबत बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांना व उपमुख्य कार्यकारी अधिकारी (बाल कल्याण), जिल्हा परिषद यांना मान्यतेसाठी सादर करण्यात येतात.
हि कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही तसेच कोणत्याही शासनाशी निगडित वेबसाईट नाही. तरीही कोणी या वेबसाईटला official वेबसाईट समजू नका. कोणीही कमेंट मध्ये आपला आधार कार्ड नंबर तसेच मोबाईल नंबर टाकू नका किंवा वैयक्तिक माहिती सांगू नका. आम्ही कोणत्याही सरकारी योजनेतील तक्रारींवर लक्ष देऊ शकत नाही. तसेच या संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीबद्दल अधिकृत माहिती आपल्याला हवी असल्यास official वेबसाईटला संपर्क करा अशी मी विनंती करतो. धन्यवाद!