Udyog Ratna Award: उद्योगरत्न पुरस्कार 2023

महाराष्ट्र राज्य सरकारचा पहिला 'उद्योग रत्न पुरस्कार' प्रसिद्ध उद्योजक माननीय रतन टाटा यांना जाहीर

Udyog Ratna Award
Udyog Ratna Award



'महाराष्ट्र भूषण' हा सर्वोत्कृष्ट पुरस्कार राज्य सरकार कडून दिला जातो.तसेच आता याच धर्तीवर महाराष्ट्र राज्य शासन 'उद्योग रत्न' पुरस्कार सुरु करणार आहे.हा पहिलाच 'उद्योग रत्न' Udyog Ratna Award पुरस्कार प्रसिद्ध तसेच नामवंत उद्योजक माननीय 'रतन टाटा' यांना देण्यात येणार आहे अशी माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधानपरिषदेमध्ये दिली.
बुधवारी झालेल्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीमध्ये रतन टाटा यांना देण्याचा निर्णय झाला.

देशाला अग्रेसर तसेच पुढे नेण्यामध्ये रतन टाटा यांचे मोलाचे सहकार्य

महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा साहित्य,विज्ञान,कला,क्रीडा अशा विविध क्षेत्रांमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्यांना दिला जातो.याच धर्तीवर उद्योगक्षेत्रातील योगदानासाठी 'उद्योग रत्न' पुरस्कार हा महाराष्ट्र राज्य शासनाकडून देण्यात येणार आहे.
टाटा समूह हा भारतातील एक जुना तसेच मोठा उद्योग समूह आहे.
रतन टाटा यांनी आपल्या कारकिर्दीत मोठी भरभराट टाटा समूहाला करून दिली.रतन टाटा हे त्यांच्या साधेपणासाठीसुद्धा खूप प्रसिद्ध आहेत.
रतन टाटा हे अनेक क्षेत्रासाठी लाखो कोटी रुपये दान करत असतात.याची आपल्याला एक प्रचिती आली आहे की रतन टाटा यांनी कोरोना संकटाच्या काळात भारत देशाला त्यांनी 1500 कोटी स्वरूपात दान केले होते.टाटा ग्रुप कडून त्यांच्या उत्पन्नातील काही वाटा हा चांगल्या कार्यासाठी दान केला जातो. 
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.