Giloy benefits in marathi

Gulvel । Giloy ।

Benefits of Giloy 

Giloy Information

in Marathi । Uses of

Gulvel । Benefits of

Giloy । Uses of Giloy ।

गुळवेल । गुळवेलचे फायदे ।

गुळवेलचा वापर । 


Giloy Benefits in marathi
Giloy Benefits in marathi


Gulvel । Giloy । Benefits

of Gulvel Gulvel Information

in Marathi । Uses of gulvel ।

Benefits of Giloy । Uses of

Giloy। गुळवेल । गुळवेलचे फायदे ।

गुळवेलचा वापर ।

आपण या लेखात आयुर्वेदामध्ये महत्व

असणाऱ्या गुळवेलबद्दलची माहिती

 Gulvel information,

गुळवेलीची विविध नावे Different

types of Gulvel names, गुळवेलीचे

उपयोग Gulvel Benefits, Uses of

Gulvel हे पाहणार आहोत.


गुळवेलबद्दल माहिती , गिलोयबद्दल माहिती

Gulvel information in marathi 

Giloy information in marathi


गुळवेल Gulvel, Giloy हि वनस्पती कडुनिंब किंवा आंबा या झाडांच्या आधारे वाढते. हि औषधी वनस्पती ज्या झाडांवर वाढते त्या झाडांचे गुणधर्म ती आत्मसात करते.कडूनिंबावर वाढलेली गुळवेल, गिलोय, गुडूची हि सर्वश्रेष्ठ मानली जाते. हि वनस्पती वेल स्वरूपात आढळते.तिच्या पानांचा आकार हा हृदयासारखा असतो.

गुळवेल - ताप, सर्दी, खोकला, दमा, सांध्यांचे दुखणे व सुजणे यांवर उपयुक्त आहे त्याचीच माहिती आपण पुढे पाहणार आहोत.

गुळवेलाचा आयुर्वेदात अमृतकुंभ असा उल्लेख करतात, तसेच ह्या वनस्पतीला रसायनकल्प देखील म्हणतात.कोणत्याही आजारातून बाहेर पडल्यावर रुग्णाच्या शरीराला पुनरुज्जीवन देण्यात गुळवेल उपयोगी ठरते.

गुळवेलीचा काढा हा खूपच फायदेशीर ठरतो कारण तो अनेक आजारांवर उपयोगी मानला जातो.

गुळवेल हि वनस्पती प्रामुख्याने भारत, म्यानमार, श्रीलंका अशा उष्णकटिबंध प्रदेशांत आढळते.

गुळवेलची वेगवेगळी नावे पुढीलप्रमाणे


मराठीमध्ये  Gulvel in marathi या वनस्पतीला गुळवेल Gulvel किंवा अमृता असे बोलले जाते.

गुळवेलला अमृतवेल असेही बोलले जाते.

गुळवेलला हिंदी मध्ये गिलोय Giloy असे देखील बोलले जाते.

संस्कृतमध्ये गुळवेलला अमृता, गुडूची, मधूपर्णी असे बोलले जाते.

English मध्ये टिनोस्पोरा कॉर्डिफोलिया (Tinospora Cordifoliya) या नावाने ओळखले जाते.

येथे क्लीक करा : One Nation One Document

उपयुक्तांग


गुळवेलीच्या वेलाचे 'कांड' हे औषध म्हणून वापरले जाते.त्यापासून गुळवेल चूर्ण, गुडूच्यादि चूर्ण, अमृतारिष्ट, गुडूची तेल, गुडूच्यादि क्वाथ तयार केले जाते.


गुळवेलचे फायदे संपूर्ण माहिती मराठीमध्ये

Gulvelche fayade in marathi

Benefits of Gulvel marathi

Benefits of Giloy marathi


रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी Immunity Booster


रोगप्रतिकार शक्ती कमी झाली की माणूस हा आजारी पडतो.त्यामुळे माणसामध्ये रोगप्रतिकार शक्ती असणे आवश्यक आहे. त्यासाठी तुम्ही गुळवेलचे सेवन करू शकता कारण आयुर्वेदामध्ये गुळवेल हि प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी खूप उपयोगी आहे असे सांगितले आहे. कारण यामध्ये इम्युनोमॉड्युलेटरी (immunomodulatory) नावाचा घटक जास्त आढळतो जो प्रतिकारशक्ती वाढविण्यास मदत करतो.

कोरफड म्हणजेच एलोवेरा (Aloe Vera) बद्दल अधिक माहितीसाठी समोरील link वर क्लीक करा: Link

पचन क्रिया सुधारण्यासाठी Digestive system improve


या धावपळीच्या जीवनामध्ये अनेकांना चयापचय क्रियेचा म्हणजेच अन्नपचनाच्या समस्या जास्त प्रमाणात वाढताना पहायला मिळत आहेत. अवेळी जेवणे,सतत तनावामध्ये राहणे यामुळे पचनक्रिया व्यवस्थित राहत नाही.त्यासाठी गुळवेल हे अत्यंत महत्वाचे औषध मानले जाते.सतत होणाऱ्या जुलाबासाठी गुळवेल हे फायदेशीर ठरते.कारण यामुळे पचनक्रिया मजबूत राहते.


मधुमेह नियंत्रणात राहण्यासाठी Diabetic control


आजच्या काळात जर सर्वे केला असता एक घर सोडले तर दुसऱ्या घरामध्ये शुगर असणारा पेशंट आढळतो.गुळवेलचा यामध्ये असा फायदा आहे की जर आपण गुळवेल पावडर रोज सकाळी उपाशीपोटी पाण्यातून सेवन केल्यास मधुमेह नियंत्रणात राहण्यास मदत होऊ शकते.गुळवेलीमध्ये असणारे अँटीहायपरग्लायसेमिक (Antihypertensemic) म्हणजेच रक्तातील साखरेची पातळी कमी करणारा घटक किंवा गुणधर्म हा गुळवेल मध्ये आढळतो.यामुळे शरीरातील इन्सुलिनची (Insulin)सक्रियता वाढवून साखरेची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते.


ताप असेल तर उपयोगी For Fever 


ताप येत असेल किंवा आला असेल तर गुळवेल ची फळे आणि पानांचा काढा बनवू शकता कि जो तापासाठी उपयोगी ठरतो कारण त्यामध्ये अँटीपायरेटिक Antipyretic म्हणजेच ताप कमी करणारा घटक असतो त्याचबरोबर अँटीमलेरियल घटक देखील असतात की जे मलेरिया infection कमी करण्यास मदत करतात. अगदी सोपा उपाय म्हणजे गुळवेलची पाउडर कोमट पाण्यामध्ये मिक्स करून घेतल्यास तापापासून सुटका मिळू शकते.



डेंग्यू चा ताप उतरविण्यासाठी देखील गुळवेल चा उपयोग होतो.


दम्यासाठी गुळवेल चा उपयोग


दम्याची लक्षण कमी करण्याची क्षमता हि गुळवेल मध्ये आहे त्यामुळे याचा रस मधासोबत मिक्स करून घेतल्यास दम्याचा त्रास कमी होण्यास मदत होते.


कफाचे आजार कमी करण्यास मदत 


श्वासनासंबंधी दमा, सर्दी, खोकला यांसारखे कफाचे आजार कमी करण्यासाठी गुळवेलचे सेवन केल्यास फायदा होतो.त्यासाठी गुळवेलचे चूर्ण किंवा टॅबलेट किंवा त्याच्या काढ्याचा वापर करू शकता किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याने सेवन केल्यास फायदा होईल.


सूज असल्यास अपायकारक


गुळवेल मध्ये विशेषतज्ञ यांच्या मते अँटीइंफ्लामेंटरी (antinflamentary), अँटीअर्थराईटीस म्हणजे सांध्याची सूज कमी करणारे घटक (anti arthritis) तसेच अँटिऑस्टीओअर्थराईटीस (Anti Osteoarthritis)म्हणजेच सांध्यांचे दुखणे आणि सूज कमी करणारे गुणधर्म आढळतात. या तीन प्रकारच्या गोष्टी कमी करण्यासाठी देखील गुळवेलचा उपयोग होतो.त्यामुळे गुळवेलाचे सेवन केल्यास शरीरावरील सूज कमी होण्यास मदत होते.

डॉक्टरांचा योग्य सल्ला घेऊन गुळवेलचे सेवन करणे.


डोळ्यांच्या समस्येसाठी गुळवेलचा उपयोग Benefits for Eye Problem


गुळवेल मध्ये असणाऱ्या immunomodulatary या घटकामुळे डोळ्यांची जळजळ, डोळे लाल होणे किंवा सूज येणे या कारणांसाठी गुळवेल पावडर चे योग्य प्रमाणामध्ये रोज पाण्यामधून सेवन केल्यास नक्कीच फायदा होऊ शकतो.


युरिक ऍसिड कमी करण्यासाठी साठी उपयोग (Uric acid)


युरिक ऍसिड वाढल्याने हाताच्या बोटांचे किंवा आपल्या शरीराच्या हात किंवा पाय यांचे joints दुखू लागतात त्यावर उपाय म्हणून देखील गुळवेलकडे पहिले जाते, तसेच गुळवेलाच्या कांडीचा रस पिल्यास आराम मिळतो किंवा गुळवेलची पावडर एक चमचा पाण्यामधून किंवा दुधामधून घेतल्यास युरिक ऍसिड कमी होण्यास मदत होते.


त्वचा उजळणेसाठी Benefits for Glowing skin


गुळवेलामध्ये असणाऱ्या रासायनिक घटकामुळे त्यामध्ये (antiaging) अँटीएजिंग प्रॉपर्टी आढळतात.त्यामुळे त्वचा सुधारण्यास मदत होते व सुरकुत्या देखील कमी होण्यास मदत होईल.


गुळवेलचा वापर  Use of Gulvel

Use of Giloy 


गुळवेलच्या पानांचा आणि फळांचा रस घेऊन त्याचा वापर करू शकता.

गुळवेलच्या रसाचा वापर हा दिवसातून 20 मिली ते 30 मिली इतका करू शकता.

गुळवेलचा काढा देखील दिवसातून 20 मिली घेऊ शकता.

Gulvel Powder Benefits

गुळवेल पावडरचा देखील उपयोग रोज सकाळी उपाशीपोटी एक चमचा कोमट पाण्यामधून पिल्यास त्याचा फायदा होतो.


गुळवेलचा काढा कसा करावा

Gulvel Kadha

Giloy Kwath


दोन कप पाणी एका भांड्यात घेऊन त्यामध्ये एक चमचा गुळवेल चूर्ण घालावे.हे मिश्रण मंद आचेवर उकळत ठेवावे.त्याचबरोबर त्यामध्ये थोडी हळद,मिरी,आले घालून उकळल्यास फायदा होईल.

हा काढा थोड्या वेळाने गॅस बंद करून तो थंड झाल्यावर सेवन करावे.अशाप्रकारे गुळवेलचा काढा केल्यास फायदा होऊ शकतो.



गुळवेलचे दुष्परिणाम Side effects of Gulvel

गुळवेल म्हणजेच गुडूची किंवा Giloy चे फायदे आरोग्यासाठी खूपच चांगले आहेत.त्यामुळे त्याचे नुकसान जास्त पहायला मिळत नाहीत.
हि एक आयुर्वेदिक औषध वनस्पती असून त्याचा वापर आयुर्वेदिक डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करावा.गुळवेल चे सेवन हे योग्य प्रमाणात करणे गरजेचे असते.दररोज गुळवेल चुर्ण खाल्ल्याने काही त्रास होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.
गर्भवती महिलांनी गुळवेलचे सेवन करण्याआगोदर डॉक्टरांचा सल्ला घेऊनच सेवन करणे योग्य ठरेल.

Gulvel powder or Giloy powder, Gulvel tablet or Giloy tablet, Giloy juice

अशा स्वरूपात गुळवेल किंवा गिलोय मिळते. हे प्रामुख्याने आयुर्वेदिक शॉप किंवा आयुर्वेदिक डॉक्टर यांच्याकडे सहज मिळून जाईल.


टीप:- गुळवेलचे किंवा गिलोयचे सेवन करण्याआगोदर तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊनच गुळवेलचे सेवन करावे.



आधार कार्ड संदर्भात new update news साठी समोरील लिंक वर क्लिक करा : 

 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.