LPG Cylinder Price: घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीमध्ये 200 रुपयांची घट

घरगुती गॅस सिलेंडरच्या

किंमतीमध्ये मोठा बदल

LPG CYLINDER PRICE

CUT BY RS.200

LPG Cylinder Price
LPG CYLINDER PRICE 


LPG Cylinder Price दिवसेंदिवस वाढती महागाई आणि या महागाईमुळे त्रस्त झालेल्या लोकांचेसाठी केंद्र सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे तो म्हणजे रक्षाबंधन आणि ओणमच्या मुहूर्तावर कमी दरामध्ये LPG सिलिंडर देण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने 33 कोटी घरगुती एलपीजी सिलिंडरच्या ग्राहकांसाठी एलपीजी सिलिंडरच्या किमती 200 रुपयांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसह सर्व घरगुती एलपीजी गॅस ग्राहकांना एलपीजी सिलिंडरच्या किंमतीमधील कपातीचा लाभ मिळणार आहे.

कॅबिनेट बैठकीमध्ये झाला निर्णय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेतलेल्या निर्णयाची माहिती देताना केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितले की, ओणम आणि रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर सरकारने सर्व एलपीजी ग्राहकांना 200 रुपयांनी स्वस्त एलपीजी सिलिंडर देण्याचा निर्णय घेतला आहे. पुढे ते म्हणाले की, सरकारच्या या निर्णयामुळे 2022-23 मध्ये सरकारी तिजोरीवर 7680 कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे.

अनुराग ठाकूर यांनी असेही सांगितले की, मंत्रिमंडळाने ७५ लाख नवीन उज्वला योजनेचे गॅस कनेक्शन देण्याचा निर्णयही घेतला आहे. यासाठी त्यांना एलपीजी कनेक्शन घेण्यासाठी एक रुपयाही द्यावा लागणार नाही. सरकारच्या या निर्णयानंतर पीएम उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या 10.35 कोटी होईल, जी आता 9.60 कोटींच्या जवळपास आहे.

कॅबिनेट पीएम उज्वला योजनेच्या ग्राहकांना 400 रुपये स्वस्त दरामध्ये मिळणार गॅस सिलेंडर

या घोषणेचा लाभ प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांनाही मिळणार आहे. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना प्रत्येक रिफिलवर आगोदरपासून 200 रुपये सबसिडी मिळत आहे. परंतु या कपातीनंतर, प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना प्रत्येक रिफिलवर 400 रुपये कमी भरावे लागणार आहेत. अनुराग ठाकूर म्हणाले की, पीएम उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना 400 रुपयांचा स्वस्त सिलिंडर मिळणार आहे.

मागील वर्षी रशिया आणि युक्रेनच्या युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कच्च्या तेलाच्या आणि वायूच्या किंमतीमध्ये मोठी वाढ झाली होती, तेव्हा मे २०२२ यावेळी मोदी सरकारने प्रति सिलिंडर २०० रुपये सबसिडी दिली होती. वर्षभरात 12 सिलिंडर रिफिल करण्याची उज्ज्वला योजना सुरू झाली ज्याची मुदत 31 मार्च 2024 पर्यंत वाढवण्यात आली.असे असतानाही या योजनेंतर्गत सिलिंडर रिफिल करणाऱ्यांना 900 रुपये खर्च होत आहेत. मात्र मंत्रिमंडळाच्या या निर्णयानंतर पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना आता 400 रुपयांच्या स्वस्त दरात एलपीजी सिलिंडर मिळणार आहे.

सध्या घरगुती गॅस सिलेंडर चा दर 1100 रुपये असून त्यामध्ये 200 रुपयांची घट होणार आहे. याचा फायदा आता नागरिकांना होणार आहे.

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.